मुलुंडच्या महाराणा प्रताप चौकात स्कायवॉक उभारणार
मुंबई : मुलुंड पश्चिम येथील महाराणा प्रताप जंक्शन येथे पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक उभारण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिकेने घेतला आहे.
बेस्ट बस आगार आणि प्रस्तावित मेट्रो स्थानकाला जोडल्या जाणाऱ्या या स्कायवॉकमुळे वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या टी विभागांतर्गत येणाऱ्या मुलुंड पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी पाच रस्ते एकमेकांना मिळतात. सततच्या वाहनांच्या रहदारीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जीवघेणे आणि त्रासाचे ठरते. त्यामुळे येथे स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
——
