शैक्षणिक

एमएचटी -सीईटी परीक्षेचा निकाल येत्या १२ जून रोजी जाहीर होणार

मुंबई, दि. १०
राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण शास्त्र, अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा ( ‘एमएचटी -सीईटी) निकाल येत्या १२ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३/२४ साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबविण्यात येणार आहे.

यावेळी पहिल्यांदाच भ्रमणध्वनीद्वारे उमेदवारांना प्रवेशप्रक्रियेचे विविध टप्पे, सूचना आणि जागावाटपाची माहिती देण्यात येणार आहे.

‘एमएचटी -सीईटी परीक्षेचा निकाल सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *