वाहतूक दळणवळण

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई, दि. १०
देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या (रविवार) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ अशी मेगाब्लॉकची वेळ आहे‌.

परिणामी मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांदरम्यान अप जलदमार्गांवर वळविण्यात येणार आहेत.

हरबर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत पनवेल आणि बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल आणि बेलापूरकडे जाणारी डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.यासह अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल आणि ठाणे येथून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

केया मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान लोकल सेवा सुरू राहणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *