वाहतूक दळणवळण

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे २५ जूनपासून विशेष गाड्या

ठाणे, दि. १०
आषाढी एकादशीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे येत्या २५ जूनपासून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

२९ जून रोजी आषाढी एकादशी झाल्यानंतर ४ जुलैपर्यंत परतीच्या प्रवासासाठी ही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे विभागातील ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरीवली नॅन्सी कॉलनी या ठिकाणाहून २५ जून पासून पंढरपूरसाठी जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

या सर्व जादा बसगाड्यांचे जाण्याचे आणि येण्याचे आरक्षण त्या त्या बस स्थानकात सुरू आहे. ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना विनामूल्य तर महिलांना पन्नास टक्के सवलतीत बस प्रवास करता येणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *