कल्याण येथे उद्या सायकल फेरी
कल्याण, दि. ३
जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या निमित्ताने उद्या (४ जून) कल्याण शहरात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणातून सायकल फेरीला सुरुवात होणार आहे.
रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता व्हॉट्स अपवर – बृहन्मुंबई महापालिकेची सुविधा सोमवारपासून सुरु
कल्याण डोंबिवली महापालिका, बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि डोंबिवली, कल्याण मधील विविध सायकल गटांतर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ही फेरी काढण्यात येणार आहे.
रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बिर्ला महाविद्यालयापासून फेरीची सुरूवात होणार असून भवानी चौक, सुभाष चौक, वालधुनी शिवाजी चौक, विठ्ठलवाडी चौक, चक्की नाका, पत्रीपूल, सहजानंद चौक, लालचौकी, वाडेघर चौक, खडकपाडा चौक या ठिकाणी फिरून बिर्ला महाविद्यालय येथेच फेरीची सांगता होणार आहे. सहभागी सायकलपटूंना टी शर्ट, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकांना अँड्रॉइड तिकीट यंत्रे देण्यात येणार
बिर्ला महाविद्यालयात होणाऱ्या उदघाटन कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, बि. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डाॅ. नरेशचंद्र, प्राचार्य डाॅ. अविनाश पाटील, समन्वयक प्रशांत भागवत उपस्थित राहणार आहेत.
—–