दहावीतील ३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’
मुंबई, दि.
इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील ३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ मिळाली आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या विषयात फेरपरीक्षेदरम्यान उत्तीर्ण झाल्यास ‘एटीकेटी’ मिळालेले हे विद्यार्थीही अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
दहावीचा राज्याचा एकूण निकाल ९३. ८३ टक्के;
अनुत्तीर्ण झालेले ८६ हजार ५९४ विद्यार्थीही फेरपरीक्षेस पात्र असून जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले तर या विद्यार्थ्यांनाही या वर्षीच अकरावी प्रवेशासाठी, किंवा इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश घेता येणार आहे.
——