Uncategorized

एमएमआरडीए’चा आपत्कालीन नियंत्रण कक्ष उद्यापासून सुरु

मुंबई, दि. ३१
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा कक्ष उद्यापासून (१ जून) सुरू होणार आहे.
एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळी, तसेच प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, निर्माण होणाऱ्या अडचणीचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक- राजदूत डॉ. राल्फ हेकनर

नियंत्रण कक्षाअंतर्गत २४ तास तक्रारींचा पाठपुरावा करून बृहन्मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे आदी संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत समन्वय साधण्यात येतो. तसेच माहितीची देवाण घेवाण करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते.

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *