नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला- उद्धव ठाकरे
मुंबई दि.११ :- माझ्यावर माझ्या घराण्याचे संस्कार आणि शिकवण आहे. म्हणूनच मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या परिचारिकांचा मोर्चा
आता माझ्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला पाहिजे, असेही उद्धव ठाकरें यांनी सांगितले. १६ आमदारांचे काय घेऊन बसलात? शिंदे फडणवीस यांचे संपुर्ण सरकारच बेकायदेशीर आणि अपात्र ठरविले गेले आहे. गुंज भर जरी नैतिकता शिल्लक असेल तर सरकार राजीनामा देईल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यात तत्कालीन राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले असल्याचेही पटोले यांनी सांगितले. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे सांगितले.