विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या परिचारिकांचा मोर्चा
मुंबई दि.११ :- विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या १२ मे रोजी परिचारिका बृहन्मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयातील कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
सांताक्रुज येथील डॉक्टरच्या हत्येची उकल
पहिल्या, दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा मोबदला पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ द्यावा, सर्व संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरावी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहाय्यक परिचारिका प्रसविका, समन्वयक, आया कमर्चाऱ्यांसाठी रजा राखीव पदे तात्काळ निर्माण करावी, डॉक्टरांच्या उपस्थितीविना नियमित लसीकरण कार्यक्रमाची सक्ती करू नये आदि मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
विकास कामांचे उदघाटन राजकारण्यांच्या हस्ते नको
कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांचे विविध प्रश्न आणि मागण्या मागील अनेक महिन्यांपासून दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात येत आहेत. मात्र त्यांच्या मागण्या आणि प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासन अनास्था दाखवत आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.