राजकीय

खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात, सांगण्याची गरज काय ?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल

मुंबई दि.१० :- सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर, त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा त्याची जात कोणती, तो कोणत्या जातीचा आहे हे सांगावे लागते. तशी नोंद पॉस मशिनमध्ये केली जाते. ही संतापजनक गोष्ट आहे, शेतकऱ्यांना जात नसते.

किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश

तुमच्या-माझ्या पोटाला जात नसते. तर खतखरेदी करताना जात, सांगण्याची गरज काय ? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून, ई-पॉस मशिनच्या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. त्यात, ई-पॉसमध्ये जातीचा रकाना नव्याने टाकला आहे.

महापालिका प्रशासनाकडून साडेचार हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल

जातीचा रकाना भरल्याशिवाय खतखरेदीची प्रक्रिया पुढे जात नाही. शेतकऱ्यांना जातीचे लेबल चिटकवण्याच्या सरकारच्या या प्रयत्नांबद्दल शेतकऱ्यांप्रमाणेच सभागृहातल्या विरोधी सदस्यांच्याही भावना तीव्र आहेत. ई-पॉस मशिनमधला, जात नोंदविण्याचा पर्याय आजच्या आज काढून टाकावा. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे केले आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *