महापालिका निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू- राज ठाकरे
ठाणे दि.१० :- जेव्हा कधी महापालिकांच्या निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेमध्ये असणार म्हणजे असणारच, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल येथे केले.
राज्य अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मी लवकरच आपले सरकार आणेन. आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ दूर होईल,असे सूचक विधानही राज ठाकरे यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांची घोषणाबाजी आणि सभात्याग
देशावर ६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची काय अवस्था झाली आहे, ते बघा. त्यामुळे भरती नंतर ओहोटी आणि ओहोटी नंतर भरती या गोष्टी होत राहतात. भाजपानेही हे लक्षात ठेवावे. असा इशाराही त्यांनी दिला.