ठळक बातम्या

मुंबईत पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारणार

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाय

मुंबई दि.१० :- हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे कलानगर, मानखुर्द, हाजीअली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर विचार करण्यासाठी महापालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक महापालिका मुख्यालयात झाली.

महापालिका निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू- राज ठाकरे

हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करणार आहे. बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी ही कार्यपद्धती उपयोगात आणली जाणार आहे. यासोबतच रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी व कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम उपनगरांकरिता गोराई येथे आणि शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे.

राज्य अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. सध्या महापालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत.
शिवडी, गोवंडी, पंतनगर (घाटकोपर), भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि चारकोप (कांदिवली) अशा पाच ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे कार्यादेश देण्यात आले आहेत. ही पाचही केंद्रे येत्या १५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *