पार्सल महसूलाच्या माध्यमातून मध्य रेल्वेला २३२. ५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल
मुंबई दि.१० :- आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्य रेल्वेने पार्सल महसूलाच्या माध्यमातून २३२. ५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा केला आहे. ४.५६ लाख टन पार्सल आणि सामान वाहतूकीतून सुमारे २३२.५० कोटी रुपये मिळविले.
जास्तीची झाडे तोडण्याला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली
पार्सल गाड्यांच्या २०१ फेऱ्यांमधून २४.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शालीमार पार्सल ट्रेनच्या ९९ फेऱ्यांमधून १४.९७ कोटी, भिवंडी – जळगाव ते आजरा ३० इंडेंट पार्सल ट्रेनच्या माध्यमातून ६.२५ कोटी आणि गोधनी ते तिनसुकिया जंक्शन पर्यंतच्या लीज पार्सल ट्रेनच्या २२ फेऱ्यांमधून ३.५९ कोटी उत्पन्न मिळविले आहेत.