Dombivali ; फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा (Video)
डोंबिवली दि.०८ :- होळी आणि रंगपंचमीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीने सण साजरा करण्याचा आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.
वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी- संजय राऊत
मात्र काल रात्रीच्या सुमरास डोंबिवली आजदे पाडा परिसरात अतिउत्साही तरुणांमुळे रंगाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळालं.
डोंबिवलीत फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा, घटना सीसीटीव्हीत कैद#HoliFestival #dombivli pic.twitter.com/nI3m32mpOA
— PravinW🇮🇳 (@pravinwakchoure) March 7, 2023
फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
‘मनसे’चे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
एका गटातील तरुणावर दुसऱ्या तरुणाने मुद्दाम फुगा फेकल्याने या दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर काही क्षणातच हाणामारीमध्ये झालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.