कोकणवासीयांचा शनिवारी मेळावा
मुंबई दि.०८ :- जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्ष आणि कोकण जन विकास समिती यांच्या संयुक्त वतीने येत्या ११ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे कल्याण, डोंबिवलीच्या काही भागात झाडे कोसळली; प्राणहानी नाही
रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग, रिफायनरी सारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच कोकणच्या विकासाची दिशा याविषयावर मेळाव्यात चर्चा होणार आहे. दादर पूर्व-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा मेळावा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
कोकणच्या विकासाची दिशा कोणती असावी, पर्यावरणाचा समतोल सांभाळून कोणते उद्योग-व्यवसाय कोकणात आणता येतील, कोकणातील दारिद्र्य संपविण्यासाठी काय करायला हवे, यावरही विचार केला जाणार आहे. कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.