‘मनसे’चे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
मुंबई दि.०८ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात भांडुपमधून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
शिवाजी उद्यान परिसरात प्रभात फेरीसाठी गेलेल्या देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टम्पने हल्ला करण्यात आला होता. त्या नंतर तपासात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.