अवकाळी पावसामुळे कल्याण, डोंबिवलीच्या काही भागात झाडे कोसळली; प्राणहानी नाही
कल्याण, दि. ७
कल्याण आणि डोंबिवली शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील काही भागात झाडे उडून पडली, तर जाहिरात फलकाची लोखंडी कमानही कोसळली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
माझी प्रकृती सुधारत आहे- अमिताभ बच्चन
अवकाळी पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात धुळीचे लोट पसरले तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले कल्याण मधील खडे घोळवली मल्हार नगर भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
नवी मुंबईत उद्यापासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन
डोंबिवली ठाकुर्ली उड्डाणपुलाजवळ जाहिरात फलकाची लोखंडी कमान वादळी वाऱ्यामुळे पडली. सुदैवाने त्यावेळेस येथून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी हानी टाळली.
—-