ठळक बातम्या

आणीबाणीच्या परिस्थितीत नौदलाचे हेलिकॉप्टर समुद्रात उतरविले, प्राणहानी नाही

मुंबई दि.०८ :-भारतीय नौदलाचे एक हेलिकॉप्टर आणीबाणीच्या परिस्थितीत आज मुंबईजवळ समुद्रात उतरविण्यात आले. हा प्रकार आज सकाळी घडला. हेलिकॉप्टरमधील तीन कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

‘मनसे’चे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

नियमित उड्डाण करत असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर समुद्रात उतरविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *