‘म्हाडा’ च्या उपकरप्राप्त इमारतींना आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रद्द
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई दि.०८ :- मुंबईतील ‘म्हाडा’ च्या उपकर प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रद्द करण्यात आले आहे. आता जुन्या दराने २५० रुपयेच आकारण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. नव्या दरानुसार ६६५ रुपये ५० पैसे शुल्क आकारले जात होते.
नौदलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, प्राणहानी नाही
भाजपचे आमदार अँड आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. तसेच या इमारती धोकादायक झाल्या आहेत त्यांच्यासाठी पुर्नविकास योजना लवकरच लागू करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘मनसे’चे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. झोपडपट्टीतील घरांनाही मालमत्ता कर आकारत नाही. त्यांना आपण पुनर्विकासात घर देतो. मग म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींनाच हा कर कशासाठी? तो माफ करा अथवा नाममात्र घ्या, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली होती.