वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी- संजय राऊत
मुंबई दि.०८ :- आपण केलेल्या वक्तव्याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात राऊत यांनी ही मागणी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले होते.
‘म्हाडा’ च्या उपकरप्राप्त इमारतींना आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रद्द
त्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. नोटिशीची मुदत संपूनही राऊतांनी उत्तर दाखल केले नव्हते. आज राऊतांनी नोटिसीला उत्तर दिले आहे. ४ मार्चपर्यंत मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो आणि कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही.
नौदलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, प्राणहानी नाही
त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी, असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान कोल्हापूर दौऱ्यात असताना राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख ‘चोर’मंडळ असा केला होता. या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होतं राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती.