शैक्षणिक

प्रतिभेला कौशल्य आणि ज्ञानाची जोड मिळाल्यास कोणत्याही वयात प्रगती शक्य- राज्यपाल बैस

मुंबई, दि. ७
प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गदत्त काही ना काही प्रतिभा असते. या प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो. रात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसायासाठी, ज्ञानवर्धनासाठी तरी शिकावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी मुंबईतील सांताक्रुझ येथील उपनगर शिक्षण मंडळातर्फे संचालित विकास रात्र विद्यालयाला भेट दिली आणि काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान प्रस्तावित रेल्वे स्थानक उभारणीचा मार्ग मोकळा

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी घरोघरी वर्तमानपत्र टाकले, रस्त्यांवरील दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि पुढे मोठे वैज्ञानिक झाले असे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, प्राप्त केलेले कौशल्य ज्ञान जीवनात कोठेही कामी येते, असेही राज्यपाल बैस म्हणाले. अनेक शाळांमध्ये पालकांची आर्थिक स्थिती पाहून पाल्याला शाळेत प्रवेश दिला जातो. गरीब विद्यार्थ्यांसाठी रात्र शाळा चालवून निःशुल्क शिक्षण देत असल्याबद्दल राज्यपालांनी उपनगर शिक्षण मंडळ तसेच संस्थेचे अध्यक्ष व नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांबद्द्ल गौरवोद्गार काढले.

श्री मलंग जागरण धर्म सभेत हाजीमलंग मुक्तीचा निर्धार

आपण वयाच्या १५ व्या वर्षांपासून काष्ठशिल्पकला, लाकडावरील कोरीव काम तसेच चित्रकला शिकल्याचे सांगितले. त्याशिवाय मोटार कार दुरुस्ती करावयास देखील आपण शिकून घेतल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते रात्रशाळेत शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पारस इंटरमिजिअरीस लिमिटेड या उद्योग संस्थेच्या वतीने निलेश व जिगर यांनी रात्र शाळेला विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप भेट दिले.

नवी मुंबईत उद्यापासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *