माझी प्रकृती सुधारत आहे- अमिताभ बच्चन
मुंबई, दि. ७
माझी प्रकृती आता हळूहळू सुधारत असून डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करीत आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.
राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरील आसनेही हटविली
अभिताभ बच्चन हे ‘प्रोजेक्ट के’ या नव्या चित्रपटात भूमिका करत असून चित्रपटाचे हैदराबाद येथे चित्रीकरण सुरू असताना त्यांना गंभीर दुखापत झाली. बच्चन यांच्या बरखड्यांना मार लागला. हैदराबाद येथे उपचार केल्यानंतर ते आता मुंबईत परतले आहेत.
डॉक्टरांनी सध्या त्याना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान अमिताभ बच्चन आज मुंबईतील त्यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानी आयोजित धुळवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना होळी आणि धुळवळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
—–