उन्हाची तीव्रता आणखी वाढणार, दिवसा उकाडा आणि रात्री थंडी, काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई दि.०१ :- मार्च महिन्याच्या एक तारखेपासूनच उन्हाचा चटका दिवसेंदिवस अधिक वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १ हजार ५०० ची वाढ
राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर रात्रीच्या वेळेला किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे चित्र राज्यातील काही भागात पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी
विदर्भातील अकोला, वाशिम तसेच रत्नागिरी, अमरावती, पुणे या भागात तापमानात वाढ झाली असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे तसेच आहारातही बदल करावा, असेही वेधशाळेने सुचविले आहे