राज्य शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी, ‘नाफेड’कडून कांदा खरेदीला सुरुवात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कांदा, कापसाच्या पडलेल्या दरावरून विरोधकांचा गोंधळ
मुंबई दि.२८ :- राज्य शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी असून ‘नाफेड’कडून कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी कांदा, कापसाच्या पडलेल्या दराच्या प्रश्नावरुन विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला.
समृद्ध इतिहास असणाऱ्या मराठी भाषेचे संवर्धन करणे आपले कर्तव्य – डॉ सदानंद मोरे
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात इतर सर्व मुद्दे सोडून फक्त कांदा, कापूस, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याची माहिती दिली.
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीची बैठक- मुख्यमंत्री शिंदे
आमचे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे असून आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षाही जास्त मदत केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत २.३८ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरू करण्यात येईल. कांदा निर्यातीवरही बंदी नाही
त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडले आणि विरोधकांकडे वेगळी माहिती तर तुम्ही हक्कभंग आणावा, असे प्रत्युत्तर दिले. आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचे आहे, हे एकदा ठरवले पाहिजे.