विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर सोयीसुविधायुक्त हिरकणी कक्ष सुरू
मुंबई दि.२८ :- अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त असा हिरकणी कक्ष विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या हिरकणी कक्षातील असुविधांचा मुद्दा गाजला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेला दूरध्वनी केला आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला.
राज्य शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी, ‘नाफेड’कडून कांदा खरेदीला सुरुवात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या पाच महिन्यांच्या बाळासह सहभागी झाल्या होत्या. हिरकणी कक्षातील असुविधांचा सामना त्यांना करावा लागला होता. आरोग्यमंत्री सावंत यांनी तातडीने याची दखल घेऊन आमदार अहिरे यांच्याशी संपर्क साधून येत्या २४ तासांत सुसज्ज हिरकणी कक्ष उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.
समृद्ध इतिहास असणाऱ्या मराठी भाषेचे संवर्धन करणे आपले कर्तव्य – डॉ सदानंद मोरे
मंगळवारी विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आया, परिचारिका, डॉक्टर, स्वच्छ शय्या,पाळणा व इतर सुविधा या हिरकणी कक्षात उपलब्ध करून देण्यात आल्या. हिरकणी कक्षातील या सुविधेबाबत अहिरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.