मोठागाव-माणकोली खाडी पूल (डोंबिवली पश्चिम) आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण
डोंबिवली ते ठाणे प्रवास अवघ्या वीस मिनिटांत
डोंबिवली दि.२४ :-मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात येणा-या मोठागाव-माणकोली खाडी पूल (डोंबिवली पश्चिम) आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या मे २०२३ पर्यंत हा पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. या पुलामुळे ठाणे-डोंबिवली प्रवास अवघ्या २० मिनिटांत करता येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेतर्फे सावरकप्रेमींचा मेळावा
डोंबिवलीहून ठाण्यात जाण्यासाठी कल्याण, कोन, भिवंडी किंवा कल्याण- शीळ, मुंब्रा, ऐरोली- घणसोली असा मार्ग आहे. मात्र तो लांबचा, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणरा आहे. हा प्रवास जलद आणि कमी वेळेत व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.
तृणधान्यांचे सेवन केल्यास शरीराला उर्जा मिळेल – डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे प्रतिपादन
माणकोली- मोठागाव जोडरस्ता १.३ किलोमीटर लांबीचा असून महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली .
काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.