स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेतर्फे सावरकप्रेमींचा मेळावा
मुंबई दि.२४ :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पणा दिनानिमित्त अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे रविवार २६ फेब्रुवारी रोजी
सावरकरप्रेमींचा मेेळावा आयोजित कऱण्यात आला आहे.
तृणधान्यांचे सेवन केल्यास शरीराला उर्जा मिळेल – डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे प्रतिपादन
हा मेळावा या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पाटील मारुती मंदिर सभागृह, न. चिं. केळकर मार्ग, वीर कोतवाल अउद्यानाजवळ, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.
आपला दवाखान्याच्या माध्यमातून चार लाखांहून अधिक रुग्णांवर औषधोपचार
या मेळाव्यात अधिवक्ता सतीश देशपांडे यांचे ‘भाजप काँग्रेसच्या वाटेवर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास दिनेश भोगले हे अध्यक्ष तर अनुप केणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त सावरकरप्रेमी मंडळींनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.