मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक
मुंबई, दि. २१
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.
मंत्रालयातील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून ताब्यात
निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षाकडून काढून घेण्यात आल्यानंतर होणा-या या बैठकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत
आज संध्याकाळी सात वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे ही बैठक होणार असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री शिंदे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी, खासदार, आमदार हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध युवा चमूची शिवनेरी किल्ल्याला भेट
शिवसेनेच्या आगामी वाटचालीबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवे पक्षप्रमुख म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे राष्ट्रीय नेते, उपनेते यांचीही नव्याने निवड करण्यात येणार आहे.
——