कुर्ला येथील इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी
मुंबई दि.१५ :- कुर्ला येथील एका बहुमजली इमारतीत बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. कोहिनूर सिटी परिसरात प्रीमियर संकुलातील इमारत क्रमांक ७ मध्ये बुधवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली.
विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्यावर विश्वासच कसा ठेवलात?
इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून दहाव्या मजल्यापर्यंत धूर पसरला होता. त्यामुळे रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुखरूप सुटका केली.