मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवर फे-यांच्या संख्येत वाढ
मुंबई दि.१४ :- दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवर फे-यांची संख्या वाढविण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओपीएल) घेतला आहे. हा निर्णय पुढील दोन महिन्यांपुरता असणार आहे. पुढे हीच वेळ कायम ठेवायची, वाढवायची की कमी करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईतील नालेसफाईसाठी २२६ कोटी रुपयांची तरतूद
नव्या वेळापत्रकानुसार आता गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची गाडी रात्री साडेनऊ वाजता तर गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची गाडी रात्री साडेदहा वाजता सुटणार आहे. अंधेरी पश्चिमेकडून गुंदवलीसाठी शेवटची गाडी रात्री साडेनऊ वाजता, अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची गाडी रात्री साडेदहा वाजता सुटणार आहे.
अपस्मार व्यवस्थापनासाठी योग तसेच फिजिओथेरपीचीही मदत घ्यावी ; राज्यपाल कोश्यारी
दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची गाडी १० वाजून तीन मिनिटांनी तर दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी शेवटची गाडी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी सुटणार आहे. तर दहिसर पूर्वेकडून डहाणूकरवाडीसाठी शेवटची गाडी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी वाजता सुटणार आहे.