मुंबईतील नालेसफाईसाठी २२६ कोटी रुपयांची तरतूद
मुंबई दि.१४ :- मुंबईतील नालेसफाईसाठी येत्या वर्षभरात २२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोठ्या आणि छोट्या नाल्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
अपस्मार व्यवस्थापनासाठी योग तसेच फिजिओथेरपीचीही मदत घ्यावी ; राज्यपाल कोश्यारी
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी, नाल्यांमधील गाळ काढण्यात येतो. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७० टक्के गाळ पावसाळ्याआधी, १५ टक्के पावसाळ्यादरम्यान आणि १५ टक्के पावसाळ्यानंतर गाळ काढला जातो.
हिंदू महिलांनी घरातील सर्व खरेदी हिंदुंकडूनच करावी – रणजित सावरकर
एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्यात येते. यावर्षीही महानगरपालिकेने नालेसफाईच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. मात्र अद्याप कंत्राटदाराची नियुक्त करण्यात आलेले नाही. यंदा नालेसफाईची कामे प्रशासकीय राजवटीत
होणार आहेत.