विकास कामांच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या कल्याणमध्ये
कल्याण दि.१४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) कल्याणमधील विविध विकास कामांचे उदघाटन होणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवर फे-यांच्या संख्येत वाढ
कल्याण मधील काळा तलावाचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभिकरण करण्यात आले आहे. वाडेघर आणि आंबिवली भागात दोन नवीन मल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त दांगडे म्हणाले.
मुंबईतील नालेसफाईसाठी २२६ कोटी रुपयांची तरतूद
दरम्यान कल्याण पश्चिम येथील संतोषी माता रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मैदान येथे मुख्यमंत्री शिंद, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी पाच अशी सभेची वेळ आहे.