रणांगण ते सामाजिक सुधारणा आणि विविध क्षेत्रात ब्राह्मणांचे महत्त्वपूर्ण योगदान- उपमुख्यमंत्री फडणवीस
डोंबिवली दि.१४ :- लढाईची गरज होती तेव्हा ब्राह्मण वर्ग तलवार घेऊन रणांगणात उतरला आणि सामाजिक सुधारणा करायची होती तेव्हा समाज सुधारक म्हणूनही ब्राह्मणांनी योगदान दिले. समाजाच्या विविध क्षेत्रात ब्राह्मण वर्गाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ संस्थेच्या मुंबई विभागातर्फे ब्राह्मण उद्योजकांची दोन दिवसांची परिषद डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात पार पडली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
विकास कामांच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या कल्याणमध्ये
संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अरविंद कोऱ्हाळकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अभिनेते प्रशांत दामले आदि यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ ब्राह्मण उद्योजकांनी उद्योगात नव्या नव्यने पुढे येणाऱ्या ब्राह्मण समाजातील तरुणींना मार्गदर्शन, पाठिंबा देण्यासाठी ‘बीबीएनजी’ सारख्या संस्था स्थापन करुन मोठे काम केले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवर फे-यांच्या संख्येत वाढ
देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात विविध उद्योग, व्यवसायांमध्ये ब्राह्मण समाजातील तरुण, तरुणी उद्योजक म्हणून हिरीरिने काम करत असून जगातील सात महत्वपूर्ण कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्राह्मण समाजातील आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांच्या हस्ते श्रीपाद खेर, संदीप झा, अमित महाजन, अरविंद कोऱ्हाळकर, हेमंद वैद्य, जितेंद्र जोशी, रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘उद्यम’ पुरस्काराने तर विलास जोशी, शरयू देशमुख, गिरिश चितळे, अचला जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.