अपस्मार व्यवस्थापनासाठी योग तसेच फिजिओथेरपीचीही मदत घ्यावी ; राज्यपाल कोश्यारी
मुंबई दि.१४ :- अपस्मार किंवा आकडी येणे ही गंभीर समस्या असून योग्य औषधोपचाराने त्यावर मात करता येते. अपस्मार व्यवस्थापनासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांनाकडून वेळीच उपचार करून घ्यावे तसेच त्यासाठी योग व फिजिओथेरपीचीही मदत घ्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनाचे औचित्य साधून एपिलेप्सी फाउंडेशन या संस्थेने राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मदतीने राज्यभर आयोजित केलेल्या १०० अपस्मार शिबिरांची माहिती देणाऱ्या एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
नागरी अभिवादन न्यासातर्फे ज्येष्ठ आणि तरुणांचा नागरी सत्कार
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन अपस्मार रुग्णांसाठी सर्वंकष तपासणी व शिबिरे आयोजित करून तसेच रुग्णांवर मोफत औषधोपचार करून एपिलेप्सी फाउंडेशन दैवी कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निर्मल सुर्या यांनी एपिलेप्सी फाउंडेशनचे कार्य राष्ट्रीय स्तरावर न्यावे व त्या माध्यमातून देशातील अपस्मारीच्या अधिकाधिक रुग्णांना लाभ व्हावा अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.
हिंदू महिलांनी घरातील सर्व खरेदी हिंदुंकडूनच करावी – रणजित सावरकर
जगाच्या लोकसंख्येपैकी ५ कोटी लोकांना अपस्मारीचा त्रास असून भारतात अपस्मारीचे १.३० कोटी तर महाराष्ट्रामध्ये ११ लाख रुग्ण आहेत. योग्य औषधोपचाराने यापैकी ७० ते ८० टक्के लोक बरे होऊ शकतात असे एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निर्मल सुर्या यांनी सांगितले. फाउंडेशनचे विश्वस्त डॉ नवीन सूर्या यांनी उपस्थितांचे आभार मानले. खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा, फाउंडेशनचे विश्वस्त यांसह अपस्मार ग्रस्त व्यक्ती व लहान मुले उपस्थित होती.