गिरणी कामगार आणि वारसदारांचा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोर्चा
मुंबई दि.१३ :- गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांच्या घरांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या १२ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार आहे.
‘मनसे’च्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रम; राज ठाकरे उपस्थित राहणार
करीरोड येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १८ जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.
मात्र त्यानंतरही गिरणी कामगार किंवा वारसदारांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार आणि ‘म्हाडा’ उदासीन असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे.