वि.बा आलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या रविवारी ‘पेशकार’
कल्याण दि.१३ :- तबला वादक आणि गुरू दिवंगत वि.बा आलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होरायजन इव्हेंटतर्फे येत्या १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘पेशकार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गिरणी कामगार आणि वारसदारांचा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोर्चा
कार्यक्रमातील प्रथम सत्रात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मृदुंग किर्तन’ हा कार्यक्रम होणार आह. कार्यक्रमात पं. तळवलकर यांचे कृष्णा साळुंखे, रोहित खवले,पार्थ भूमकर, ऋषिकेश उडाळकर हे शिष्य सहभागी होणार आहेत. त्यांना अभिषेक शिनकर (संवादिनी) संगीतसाथ करणार आहेत.
‘मनसे’च्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रम; राज ठाकरे उपस्थित राहणार
दुसऱ्या सत्रात जागतिक कीर्तीचे तबला वादक तालऋषी पं. ॲनींदो चॅटर्जी यांचे एकल तबला वादन होणार आहे. हा कार्यक्रम सशुल्क असून शास्त्रीय संगीत शिकणा-यांना तिकिटावर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क. स्वप्नील भाटे ९८२०२३२६५९