‘मनसे’च्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रम; राज ठाकरे उपस्थित राहणार
मुंबई दि.१३ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन येत्या ९ मार्च रोजी ठाणे येथे गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली होती. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांसदर्भात मुद्दा या सभेत त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते.
दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांना महासंचालकपदी बढती
बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक आणि पुढील राजकीय समीकरणे याविषयी राज ठाकरे या कार्यक्रमात काही घोषणा करतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.