नागरी अभिवादन न्यासातर्फे ज्येष्ठ आणि तरुणांचा नागरी सत्कार
डोंबिवली दि.१३ :- नागरी अभिवादन न्यास, डोंबिवलीतर्फे येत्या १९ फेब्रुवारी रोजी डोंबिवली शहरासाठी निरलसपणें काम करणाऱ्या ज्येष्ठांचा, तरुणांचा आणि एका संस्थेचा सन्मान केला जाणार आहे. टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक या अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री रमेश पतंगे उपस्थित राहणार आहेत.
वि.बा आलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या रविवारी ‘पेशकार’
या कार्यक्रमात सुभाष मुंदडा(ग्रंथालय व्यवस्थापन),सुरेश फाटक (वनवासी कल्याण), श्रीकांत पावगी (शिक्षण ,पत्रकारिता) आणि डॉ अंजली आपटे(दिव्यांग सेवा,) तर ज्येष्ठांचा, युवाचैतन्य सन्मानाने रुपाली शाईवाले(पर्यावरण), अमोल पोतदार(शिक्षण) राही पाखले (सुवर्णपदक जिमनास्ट) यांचा सन्मान केला जाणार आहे.
गिरणी कामगार आणि वारसदारांचा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोर्चा
तर संस्था सत्कारसाठी विवेकानंद सेवा मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. गजानन माने यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी विशेष सत्कार होणार आहे
डोंबिवली शहरातील ४७ संस्थांनी स्थापन केलेल्या नागरी अभिवादन न्यास या शिखर संस्थेतर्फे २०१४ पासून नागरी
अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येत आहे.