हिंदू महिलांनी घरातील सर्व खरेदी हिंदुंकडूनच करावी – रणजित सावरकर
पनवेल दि.१४ :- हिंदुराष्ट्र स्थापन करावयाचे असेल तर प्रथम काय आणि कोणाकडून खरेदी करावयाचे ते महिलांनी ठरवावे आणि हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी, काम करून घ्यावे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी रविवारी पनवेल येथे केले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा रविवारी सायंकाळी पनवेल येथे दि मिडल क्लास को ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
नागरी अभिवादन न्यासातर्फे ज्येष्ठ आणि तरुणांचा नागरी सत्कार
१९४७ च्या फाळणीची पुनरावृत्ती झाली तर जगात अन्यत्र जायला हिंदुंना जागाही उरणार नाही. रस्त्यावर असणारे हिंदू व्यावसायिक जाऊन तिथे मुसलमान व्यावसायिक आले आहेत. हे आर्थिक युद्धही आहे, असेही सावरकर यांनी सांगितले. भारतातील १०० कोटी हिंदू रस्त्यावर उतरतील तेव्हा हिंदु राष्ट्र येईल. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंच्या संघटनशक्तीसमवेत आध्यात्मिक सामर्थ्याचीही आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदूंनी उपासनेची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे, असे सनातन संस्थेचे प्रचारक अभय वर्तक म्हणाले.
वि.बा आलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या रविवारी ‘पेशकार’
तर भारतात १४ टक्के मुसलमानांच्या मागणीसाठी ८० टक्के हिंदु समाजाला सक्तीने हलाल उत्पादने विकली जात आहेत. भारतीयांची वंशपरंपरागत भूमी वक्फ कायद्याच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात हडप केली जात आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे जिहाद्यांचे षड्यंत्र आहे. औरंगजेब, अफजलखान यांचे उदात्तीकरण थांबवल्याखेरीज खरा इतिहास लक्षात येणार नाही. प्रत्येक गड-किल्ला इस्लामी अतिक्रमणमुक्त करण्याची वेळ आली आहे, असे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील धनवट म्हणाले.
गिरणी कामगार आणि वारसदारांचा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोर्चा
डॉ. दीक्षा पेंडभाजे यांनी लव्ह जिहादसारखी संकटे आज हिंदूंच्या मूळावर उठली आहेत. ती परतवून लावण्यासाठी हिंदु स्त्रियांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन धर्माचरणासमवेत स्वरक्षण प्रशिक्षण घेणेही आवश्यक असल्याचे सांगितले. सुनील कदम यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा घेतला तर प्रसाद वडके यांनी सूत्रसंचालन केले. पनवेल येथे हिंदू जनजागृती सभेत दीप प्रज्वलन करताना सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, हिंदू जनजागृती समितीचे सुनील धनवट, डॉ. दीक्षा पेंडभाज आणि सनातनचे अभय वर्तक,