शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना फटका
मुंबई दि.१३ :- विविध मागण्यांसाठी कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे.
मुंबईत देशातील पहिली दुमजली वातानुकूलित ‘बेस्ट’ बस
राज्य उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची लेखी परीक्षा तोंडावर आली आहे. मात्र या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षाच झालेल्या नाहीत.
नियोजित मुस्लिम दफनभूमी विरोधात सकल हिंदू समाजाचा हिंदू जन आक्रोश मोर्चा
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला असल्याने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षेच्या आधी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतात.