मुंबईत देशातील पहिली दुमजली वातानुकूलित ‘बेस्ट’ बस
मुंबई दि.१३ :- वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गांवर ‘बेस्ट’कडून लवकरच वातानुकूलित दुमजली बस धावणार आहे. मुंबईतीलच नव्हे तर देशातील ही पहिलीच वातानुकूलित दुमजली बस असणार आहे.
नियोजित मुस्लिम दफनभूमी विरोधात सकल हिंदू समाजाचा हिंदू जन आक्रोश मोर्चा
या बसमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असणार आहेत. पहिल्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत या बसचे तिकीट सहा रुपये इतके असणार आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन
ही बसला पुण्यातील ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून (ARAI) फिटनेस सर्टिफिकेट मिळाले असून ‘स्विच’ कंपनीने ही बस तयार केली आहे. ४५ मिनिटांच्या चार्जिंगनंतर ही बस १०० किलोमीटरपर्यंत धावू शकणार असून संपूर्ण बस चार्जिंगसाठी एक तास वीज मिनिटे लागणार आहेत. बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असून बसची प्रवासी क्षमता ८० इतकी आहे.