‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई दि.१० :- ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र असून या रेल्वे गाड्या भारताचा वेग आणि ‘स्केल’ अशा दोन्हींचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
गोकुळ दुधाच्या किंमतीत आजपासून वाढ
आतापर्यंत अशा १० रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले गेले असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात आधुनिक रेल्वे सुरू करण्यात आल्या असून मेट्रोचा विस्तार होत आहे.
नवे विमानतळ आणि बंदरे तयार केली जात आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा १० लाख कोटी रुपये भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत.
राज्यातील २८ हजारांहून अधिक नादुरुस्त रोहित्रे बदलली
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत असून देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला आनंद होत आहे, असे मोदी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वे विभागाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष झाले होते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या यांच्या कारकिर्दीत यात बदल झाला. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरदूत करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना गणपतीची मूर्ती आणि वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.