राज्यातील २८ हजारांहून अधिक नादुरुस्त रोहित्रे बदलली
मुंबई दि.१० :- शेतकऱ्यांसाठी ‘महावितरण’ कंपनीने राज्यातील २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्रे गेल्या सव्वादोन महिन्यात बदलली आहेत. कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला दिले होते.
महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाची मोहिम
ज्या ठिकाणी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाले असेल, त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी ‘महावितरण’च्या संबंधित कार्यालयात किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी