पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर – वंदे भारत ट्रेनचे उदघाटन
मुंबई दि.०९ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ( १० फेब्रुवारी) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते ‘वंदे भारत ट्रेन’ उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच मरोळ येथील एका कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने मुंबई शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.