वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी ३५० खारफुटी तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी
मुंबई दि.०९ :- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी ३५० खारफुटी तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य महायज्ञाचा शुभारंभ – ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीरे
या महामार्गाच्या बांधकामासाठी ३५० खारफुटी कापण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी एनएचएआयने उच्च न्यायालयात याचिका केली होती.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने प्राधिकरणाची ही मागणी मान्य करून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली.