कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे वीज सेवा पुरवून ‘महावितरण’चा नावलौकीक वाढवावा- राजेंद्र पवार
पुणे दि.१० :- कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे वीज सेवा पुरवून वीज देयकाचा महसूल गोळा करावा आणि उत्तम सेवा देऊन ‘महावितरण’ चा नावलौकीक वाढवावा , असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.
वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी ३५० खारफुटी तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी
भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा नुकताच सौदामिनी सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यावेळी पवार बोलत बोलत होते. संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी शिरीष काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य महायज्ञाचा शुभारंभ – ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीरे
सहाय्यक कामगार आयुक्त डी डी पवार, महामंत्री सचिन मेंगाळे, संघटनमंत्री उमेश अणेराव, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले तर सुमीत यांनी आभार मानले.