मुंबई सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव नको!
शेखर जोशी
मुंबई दि.०७ :- कोणताही रस्ता, चौक, पादचारी किंवा उड्डाणपूल, महामार्ग बांधून झाला की त्याला कोणाचे नाव द्यायचे या प्रश्नावरुन चर्चा, वादविवाद व्हायला सुरुवात होते. मुंबईतील सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी मंगेशकर कुटुंबीयांकडून करण्यात आली आणि पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मुंबई सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव नको, असे मला वाटते.
स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेवर ‘तेजस’ लढाऊ विमानाची चाचणी यशस्वी
लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वरळी हाजीअली येथे लता मंगेशकर स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. बृहन्मुंबई महापालिकेतर्फे हे स्मारक उभारले जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी ही मंगेशकर कुटुंबीयांची मागणी असल्याचे सांगितले. लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पूर्ण आदर ठेवून मला असे वाटले की मंगेशकर कुटुंबीयांची ही मागणी अयोग्य आणि चुकीची आहे. मुंबईत उभारण्यात येणा-या संगीत विद्यापीठाला लता मंगेशकर यांचेच नाव देण्यात आले आहे.
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशनतर्फे डोंबिवलीत दोन दिवसीय व्यावसायिक परिषद
एखाद्या प्रकल्पाला अमूक व्यक्तीचे नाव देतात त्या प्रकल्पाशी संबंधित व्यक्तीचे नाव दिले पाहिजे असे वाटते. त्यामुळे मुंबई सागरी किनारा मार्गाला नाव द्यायचेच असेल काही नावांचे पर्याय समोर आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे, भगवान परशुराम, अगस्ती ऋषी यापैकी कोणा एकाचे नाव या मार्गाला देणे अधिक योग्य ठरेल.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिस बंदरात बोटीतून मारलेली उडी जगविख्यात आहे. त्यांनी लिहिलेले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ ही कविता/गाणे प्रसिद्ध आहे. समुद्र, सागर आणि सावरकर यांचा निकटचा संबंध आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येणार अशी चर्चा होती पण ऐनवेळी राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले. झालेली ती चूक सुधारण्याची आता संधी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे पहिले प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे होते. त्यामुळे या सागरी मार्गाला त्यांचेही नाव देणे योग्य ठरेल. पौराणिक काळात समुद्र हटवून कोकण प्रदेशाची निर्मिती भगवान परशुराम यांनी केली अशी मान्यता आहे. मुंबई हा ही कोकणचाच एक भाग आहे. त्यामुळे परशुराम यांच्याही नावाचा विचार केला पाहिजे. पौराणिक काळात अगस्ती ऋषींनी समुद्र प्राशन केला, अशी गोष्ट आहे. म्हणून अगस्ती ऋषींच्या नावाचाही विचार केला जावा.
मुंबई सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव नको!
मुंबई सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव देण्याच्या मंगेशकर कुटुंबीयांच्या मागणीवरून समाज माध्यमांतून टीका केली जात आहे. त्यासाठी मुंबईतील पेडर रोड येथील उड्डाणपूलाला मंगेशकर भगिनींनी कसा विरोध केला ते बोलले जात आहे. आणि आता त्याच मंगेशकर कुटुंबाकडून सागरी मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.