‘मौखिक आरोग्यासाठी ‘फिंगर बाऊल’ मध्येहात धुण्याची पद्धत बंद करावी- राज्यपाल कोश्यारी
मुंबई दि.०२ :- आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता ‘फिंगर बाऊल’मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतआरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री’ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ‘मेडियुष’ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यंदाचा अर्थसंकल्प सक्षम भारताचा आणि आत्मनिर्भर – ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन
‘स्वच्छ मुख अभियान’ हा चांगला उपक्रम आहे, परंतु असे अभियान हे एक दिवस राबविण्याचे काम नाही. त्यासाठी प्रत्येकदा खाणे झाल्यानंतर चुळा भरुन तोंड धुण्याची पारंपरिक पद्धत टिकवणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘मेडीयुष’चे सह-संस्थापक डॉ गोविंद भताने, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे, ‘ओरल हेल्थ मिशन’चे डॉ दर्शन दक्षिणदास, डॉ विश्वेश ठाकरे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळे आदि यावेळी उपस्थित होते.