केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही विशेष तरतूद नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा
मुंबई दि.०२ :- केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा पडली.
‘मौखिक आरोग्यासाठी ‘फिंगर बाऊल’ मध्येहात धुण्याची पद्धत बंद करावी- राज्यपाल कोश्यारी
मुंबईतून करांचा मोठा वाटा केंद्र सरकारला मिळत असताना या शहरासाठी केंद्र सरकारने अधिक निधी द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यांत अपेक्षित असताना मुंबईसाठी विशेष तरतुदींची अपेक्षा होती.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या दोन टप्प्यांचे लोकार्पण केले. त्यामुळे मुंबई किंवा एमएमआरडीए परिसरासाठी काही विशेष तरतुदी किंवा योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होती. मात्र अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही विशेष प्रकल्पाचा उल्लेख नाही.