राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.०२ :- राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यादृष्टीने सर्व बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून त्या माध्यमातून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव साजरा – विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांचेसह राज्य वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यंदाचा अर्थसंकल्प सक्षम भारताचा आणि आत्मनिर्भर – ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन
पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्यावी, शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.